वाढवण बंदराविरोधात निकोलेंची घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण बंदराविरोधात निकोलेंची घोषणाबाजी
वाढवण बंदराविरोधात निकोलेंची घोषणाबाजी

वाढवण बंदराविरोधात निकोलेंची घोषणाबाजी

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी आज (ता. २३) विधानभवन परिसरात बडोदा सुपरफास्ट हायवे आणि वाढवण बंदराला विरोध केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून त्यांनी प्रकल्पांच्या विरोधात घोषणाबाजी केली. वाढवण बंदर रद्द करा, मुंबई-बडोदा सुपरफास्ट हायवे रद्द करा, रेल्वे फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामध्ये भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा, वनाधिकार कायदा आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, अशा मागण्या निकोले यांनी केल्या.

या वेळी आमदार निकोले म्हणाले, की पालघर जिल्ह्यात विशेषतः डहाणू व तलासरीमधून विविध प्रकल्प जातात. त्यामुळे येथील स्थानिक आदिवासी पुन्हा पुन्हा विस्थापित होत आहे. गेल्या दोनतीन पिढ्या इथला शेतकरी जमीन कसत आहे. या प्रकल्पांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना मोबदला मिळालाच पाहिजे, असे निकोले म्हणाले, पण याचा मोबदला गुजरात किंवा मुंबई येथे राहणाऱ्या सावकारांना मिळत आहे. हा कसणाऱ्या शेतकरी वर्गावर घोर अन्याय आहे, अशी टीका त्यांनी केली. आमच्या भोळ्याभाबड्या आदिवासी शेतकऱ्यांना महसूल अधिकारी, कर्मचारी कार्यालयातून धुडकावून लावतात. याच कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून दलाल आमच्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आहेत, असेही निकोले यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94174 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..