जाळीत अडकलेल्या दगडाचा धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाळीत अडकलेल्या दगडाचा धोका
जाळीत अडकलेल्या दगडाचा धोका

जाळीत अडकलेल्या दगडाचा धोका

sakal_logo
By

बेलापूर, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई-पुणे महामार्गावर बेलापूर डोंगर खिंडीत पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक दगड कोसळून संरक्षक लोखंडी जाळीत अडकून पडला आहे. दगडाच्या वजनाने जाळी तुटून किंवा खिळे निघून दगड रस्त्यावरील वाहनांवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. हा धोका दिसत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

डोंगरावरून निसटलेला दगड जाळीत येऊन अडकला आहे; पण त्याच्या वजनाने जाळी किती दिवस तग धरले हे सांगता येत नाही. जाळी तुटून दगड खाली घसरला, तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही; पण प्रशासन याकडे लक्ष देत नाही. संबंधितांनी अपघात टाळण्यासाठी जाळीत अडकलेला दगड त्वरित काढावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेचे पदाधिकारी मोहन वाघमारे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94182 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..