पावसाळी आजारांचे मुंबईत ६ बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळी आजारांचे मुंबईत ६ बळी
पावसाळी आजारांचे मुंबईत ६ बळी

पावसाळी आजारांचे मुंबईत ६ बळी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कोरोनाबरोबरच पावसाळ्यातील आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजाराने सहा जणांचा बळी घेतला आहे. यापैकी दोघांचा स्वाईन फ्‍ल्‍यूने; तर अन्‍य दोघांचा डेंगीने, एकाचा मलेरियाने; तर एकाचा लेप्टोने मृत्यू झाला आहे. मृत्यू निरीक्षण समितीने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत स्वाईन फ्‍ल्‍यूमुळे एकही मृत्यू झालेला नव्हता, पण या वर्षी स्वाईन फ्‍ल्‍यूमुळे बळींची नोंद झाली आहे.

मुंबईत पावसाळ्यातील आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये १ ते २२ ऑगस्टपर्यंत मलेरियाचे ५०९, लेप्टोचे ४६, डेंगीचे १०५, गॅस्ट्रोचे ३२४, हेपेटायटीसचे ३५, स्वार्इन फ्‍ल्‍यूचे १६३ आणि चिकनगुनियाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी काढली तर मुंबईत दररोज मलेरियाचे २३, लेप्टोचे २, डेंगीचे ५, गॅस्ट्रोचे १५ आणि स्वाईन फ्‍ल्‍यूचे सात रुग्ण आढळून येत आहेत; मात्र २०२० आणि २०२१ मध्ये स्वाईन फ्‍ल्‍यूमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. या वर्षी जुलै महिन्यात स्वाईन फ्‍ल्‍यूमुळे दोघांचा मृत्यू झाला होता.
कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले, की आता सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. विषाणूचा प्रसारही झपाट्याने होत आहे. त्यामुळे लोकांनी आता खूप सावध राहण्याची गरज आहे.
...

२८ पैकी ६ संशयितांचा मृत्यू
मुंबईत पावसाळ्यातील आजारांमुळे झालेल्या संशयितांच्या मृत्यूला निरीक्षण समितीने दुजोरा दिला आहे. पावसाळी आजार लेप्टो, डेंगी, स्वाईन फ्‍ल्‍यू आणि मलेरियामुळे २८ संशयितांपैकी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे आढावा समितीने स्पष्ट केले आहे.
....
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ८ ते ५५ वयोगटातील

लेप्टो, स्वाईन फ्‍ल्‍यू, मलेरिया आणि डेंगीने मृत्यू झालेल्यांचे वय ८ ते ५५ वर्षांच्‍या दरम्यान आहे. गेल्या महिन्यात जूनमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता आणि जुलैमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीचा डेंगीने मृत्यू झाला होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आठ वर्षीय मुलगी १९ जूनपासून आजारी होती आणि तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २२ जून रोजी प्रकृती खालावल्याने तिला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. शिफ्टिंगदरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला आणि निधन झाले. गेल्या महिन्यांत ४२ वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्‍ल्‍यूने मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्‍या प्रवासाचा इतिहासही आहे. ही व्यक्ती काश्मीर आणि अमेरिकेत गेली होती. तेव्हापासून ते आजारी पडले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.

सध्याची स्थिती (१ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट)

आजार रुग्ण
मलेरिया - ५०९
लेप्टो - ४६
डेंगी - १०५
गॅस्ट्रो- ३२४
हेपेटायटीस - ३५
चिकुनगुनिया - २
स्वाईन फ्‍ल्‍यू- १६३

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94183 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..