विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न
विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

विधानभवन परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईत विधानभवनाच्या परिसरात आत्मदहनाच्या प्रयत्नाची घटना मंगळवारी (ता. २३) घडली. विधानभवनाच्या बाहेर ग्रामीण भागातून आलेल्या एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या व्यक्तीचे नाव सुभाष भानुदास देशमुख (वय ५५) असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदळेवाडीचा रहिवासी आहे.
पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे संबंधित व्यक्तीचे प्राण बचावले आहेत. आग विझवण्यात आली तेव्हा या व्यक्तीचे संपूर्ण अंग काळे पडले होते. या व्यक्तीने नेमक्या कोणत्या कारणासाठी आत्मदहन केले, हे समजू शकलेले नाही. या व्यक्तीला उपचारांसाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वप्रथम हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू झाला. लवकरच सभागृहाला यासंदर्भात माहिती देऊ, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94194 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..