पत्नीला रेल्वेखाली ढकलून देणाऱ्या पतीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीला रेल्वेखाली ढकलून देणाऱ्या पतीला अटक
पत्नीला रेल्वेखाली ढकलून देणाऱ्या पतीला अटक

पत्नीला रेल्वेखाली ढकलून देणाऱ्या पतीला अटक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : पत्नीला रेल्वेखाली ढकलून देऊन मुलांसह पळ काढणाऱ्या पतीला गुन्हे शाखेने १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सोमवारी (ता. २२) पहाटे घडली होती. सीसीटीव्हीत हा प्रकार आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. मेहंदी हसन अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. तो व्यवसायाने पेंटर आहे. पत्नीच्या विवाह्यबाह्य संबंधाचा संशय आणि यातून होणाऱ्या भांडणांमुळे त्याने हा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिलेला रेल्वेखाली ढकलून दोन मुलांसह पळ काढणाऱ्या पुरुषाचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले होते. वसई रेल्वेस्थानकात हा प्रकार सोमवारी घडला होता. यासाठी रेल्वे पोलिसांनी आठ पथके तपासासाठी तैनात केली होती. आरोपी भिवंडी येथे गेल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर पोलिसांनी भिवंडीच्या टेमघर झोपडपट्टीमधून सापळा रचत त्याला अटक केली. या वेळी आरोपी मेहंदी हसन अन्सारी याने आपली पत्नी नूर निसा अन्सारी (वय २५) हिचे विवाह्यबाह्य संबंध असल्याचा आपल्याला संशय होता. यातून आमची सतत भांडणे होत असत, असे सांगितले. यातूनच त्याने पत्नीचा खून केल्याचे कबुल केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94198 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..