गणेशोत्सव कालावधीत मध्यरात्रीही बेस्टची सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव कालावधीत मध्यरात्रीही बेस्टची सेवा
गणेशोत्सव कालावधीत मध्यरात्रीही बेस्टची सेवा

गणेशोत्सव कालावधीत मध्यरात्रीही बेस्टची सेवा

sakal_logo
By

गणेशोत्सव कालावधीत मध्यरात्रीही बेस्टची सेवा
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. २३ : गणेशोत्सव कालावधीत मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने विशेष बसचे नियोजन केले आहे. मुंबईकरांच्या मागणीवरून तसेच गणेशोत्सव मंडळांना भेटी देणे सोयीचे व्हावे यासाठी बेस्ट उपक्रमाकडून ही सेवा देण्यात येणार आहे. एकूण २५ विशेष फेऱ्या बेस्ट उपक्रमाकडून चालवण्यात येतील. त्यामध्ये प्रामुख्याने ३१ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत या बसच्या फेऱ्या मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत नऊ मार्गांवर या २५ फेऱ्यांचे नियोजन बेस्टने केले आहे. तसेच प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी बस चालवण्याचीही तयारी उपक्रमाने दर्शवली आहे. मुंबईच्या विविध भागांत भेट देण्यासाठी प्रवाशांनी सार्वजनिक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्टकडून करण्यात आले आहे. सुरक्षित, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बेस्टच्या सेवेचा गणेशोत्सव कालावधीत अवलंब करा, असेही बेस्टने म्हटले आहे.

कोणत्या मार्गावर बसची सुविधा?
बसमार्ग क्रमांक पासून पर्यंत
१ मर्यादित इलेक्ट्रिक हाऊस वांद्रे रेक्लेमेशन
४ मर्यादित ओशिवरा आगार सर जे. जे. रुग्णालय
७ मर्यादित विक्रोळी आगार सर जे. जे. रुग्णालय
६६ मर्यादित राणी लक्ष्मीबाई चौक कुलाबा आगार
२०२ मर्यादित माहीम बस स्थानक बोरिवली स्थानक (प)
सी ३०२ राणी लक्ष्मीबाईक चौक महाराणा प्रताप चौक मुलुंड
सी ३०५ बॅकबे आगार धारावी आगार
सी ४४० माहीम बस स्थानक बोरिवली स्थानक पूर्व

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94199 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..