श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रमजीवी संघटनेचे धरणे  आंदोलन
श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन

श्रमजीवी संघटनेचे धरणे आंदोलन

sakal_logo
By

पालघर, ता. २३ (बातमीदार) ः तालुक्यातील आदिवासी पाड्यातील विविध मागण्यांसाठी आज (ता. २३) श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. गावपाड्यातील रस्त्यांची दुरवस्था, जातीचा दाखला आदी मागण्या यात मागण्यात आल्या.

पालघर तालुक्यातील आदिवासी गावपाड्यातील रस्त्यांची अवस्था, वनजमीन, घराखालील जागा नियमानुकूल करणे, जातीचे दाखले देण्यासाठी अडवणूक थांबवणे, वनजमिनी नावावर करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पालघर तालुका श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष दिनेश पवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

फोटो श्रमजीवी संघटनेचे आंदोलन महिलांचा सहभाग मोठा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94203 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..