घोडबंदरच्या पाणीटंचाईबाबत कृती आराखडा ठरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडबंदरच्या पाणीटंचाईबाबत कृती आराखडा ठरणार
घोडबंदरच्या पाणीटंचाईबाबत कृती आराखडा ठरणार

घोडबंदरच्या पाणीटंचाईबाबत कृती आराखडा ठरणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाण्यातील घोडबंदर पट्ट्यातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे, पण त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात मागणी केली. येत्या शुक्रवारी महापालिकेत बैठक होणार असून कृती आराखडा ठरणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.

घोडबंदर पट्ट्यात मोठमोठी गृहसंकुले उभारण्यास महापालिकेने परवानगी देताना त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मात्र चालढकल केली आहे. परिणामी लाखो रुपयांची कर्जे घेऊन घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. यावर पालिकेमार्फत ठोस उपाययोजना होत नसल्याने टँकर लॉबीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे पालिका आमच्यासाठी आहे की टँकर लॉबीसाठी, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. जोपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत पालिकेने नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी भूमिका आमदार संजय केळकर यांनी घेतली आहे. या पट्ट्यातील पाच भागांत केळकर यांनी दौरा करून पाणी समस्या जाणून घेतली. या दौऱ्यात निळकंठ ग्रीन, हिलक्रिस्ट, कॉसमॉस लाऊंज, पूजा गॅलेक्सी, लोढा स्प्लेंडर तसेच पाचपाखाडी आनंद सावली, धर्मवीर नगर आदी संकुलांमधील नागरिकांचा विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने समावेश होता. सर्वसामान्य नागरिकांनी एकीकडे घरकर्जाचे हप्ते भरायचे, पालिकेची पाण्याची बिले भरायची आणि दुसरीकडे टँकरसाठी लाखो रुपये मोजायचे. हे किती दिवस चालणार. पालिका नागरिकांसाठी आहे की टँकर लॉबीसाठी, असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94204 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..