अखेर पालिकेने बुजवले वृक्षवल्ली चौकातील खड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पालिकेने बुजवले वृक्षवल्ली चौकातील खड्डे
अखेर पालिकेने बुजवले वृक्षवल्ली चौकातील खड्डे

अखेर पालिकेने बुजवले वृक्षवल्ली चौकातील खड्डे

sakal_logo
By

कांदिवली, ता. २४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील महात्मा गांधी व लिंक रोड जोडणाऱ्या वृक्षवल्‍ली चौकातील खड्ड्यांमुळे वाहनचालक तसेच पादचारी त्रस्‍त झाले होते. सातत्‍याने कार्यवाही करूनही खड्डे पडत असल्‍याने पालिकाही हतबल झाली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेचे सिमेंट काँक्रीटच्या साह्याने हे खड्डे बुजवले आहेत. त्‍यामुळे वाहनचालकांना सध्यातरी दिलासा मिळाला आहे.
लिंक रोड आणि एमजी रोड जोडणाऱ्या डहाणूकर वाडी मेट्रो रेल्वे स्टेशन खालील वृक्षवल्ली चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या चौकात जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी आणि काही इतर केबल्सच्या टाक्या आहेत. या टाक्यांच्‍या झाकणांच्या आजूबाजूला खड्डे पडतात. पालिका वारंवार खड्डे बुजवत असते. मात्र पावसामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमध्ये प्रवासी आणि वाहनचालक हैराण झाले होते. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी या खड्ड्यांबाबत आंदोलन करून प्रतीकात्‍मक शवयात्रा काढली होती. त्‍या वेळी पालिका सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले होते. पावसाच्या विश्रांती नंतर पालिकेने चौकातील सर्व खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साह्याने बुजविले आहेत. यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे बुजवलेले खड्डे पुन्हा पडत होते. पाऊस थांबताच खड्डे बुजवण्यात आले आहेत.
– समीर सानप, अभियंता, आर दक्षिण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94206 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..