चेंबूरमधील सराईत गुंड स्थानबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूरमधील सराईत गुंड स्थानबद्ध
चेंबूरमधील सराईत गुंड स्थानबद्ध

चेंबूरमधील सराईत गुंड स्थानबद्ध

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २४ (बातमीदार) ः चेंबूरमधील सराईत गुंड कार्तिक देवेंदर ऊर्फ बाबू याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी सोमवारी स्थानबद्धतेची प्रक्रिया करत ठाणे कारागृहात रवानगी केली. एका गुन्ह्याच्या तपासावेळी तो सराईत गुन्हेगार असल्याचे व तो परिसरात दहशत माजवत असल्याचे समोर आले होते. त्यानुसार एमपीडीए कायद्यानुसार परिमंडळ ६ च्या उपायुक्तांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केला होता. त्याची दखल घेत कार्तिकला सोमवारी स्थानबद्ध करण्यात आले.
मार्च महिन्यात त्याने लक्ष्मीनगर परिसरात पदम दान यांना चाकूचा धाक दाखवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. दान यांनी त्याला न जुमानल्यामुळे पोटाला चाकू लावून त्यांच्या खिशातील पैसे त्याने हिसकावले होते. त्या वेळी पदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना कार्तिक हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. आरसीएफ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मी नगर, काली बस्ती, म्हैसूर वसाहत, माहुल रोड, वाशीनाका परिसर तसेच शंकर देऊळ लगतच्या परिसरात त्‍याने दहशत निर्माण केली होती. त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे मागील ४ वर्षांत नोंदववण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, अशी माहिती आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब घावटे यांनी दिली आहे.

एमपीडीए कायदा काय आहे?
महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक १९८१ असे या कायद्याचे नाव आहे. या अंतर्गत झोपडपट्टी दादा, मद्य, अमली पदार्थांचा तस्कर, विक्रेता, चोर, चित्रफितींची बेकायदा प्रत बनवून त्याचा प्रसार करणारा, वाळूमाफिया, धोकादायक व्यक्ती त्याच्या धोकादायक कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी केलेली कारवाई या कायद्यांतर्गत करण्यात येते. ११ जून १९८१ पासून हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94218 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..