खड्डे भरण्याच्या प्रात्यक्ष‍िकाची आयुक्‍तांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे भरण्याच्या प्रात्यक्ष‍िकाची आयुक्‍तांकडून पाहणी
खड्डे भरण्याच्या प्रात्यक्ष‍िकाची आयुक्‍तांकडून पाहणी

खड्डे भरण्याच्या प्रात्यक्ष‍िकाची आयुक्‍तांकडून पाहणी

sakal_logo
By

कल्याण, ता. २४ (बातमीदार) : अखेर कल्याण-डोंबिवलीमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रस्त्यामधील खड्डे बुजविण्याच्‍या कामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक पद्धतीने खड्डे भरण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्ष‍िकाची पाहणी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी केली.
महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे गणेशोत्सवापूर्वी करावीत, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी डोंबिवलीतील ९० फुटी रस्त्यावर अल्ट्राटेक कंपनीमार्फत अत्याधुनिक पद्धतीने खड्डे भरण्याच्या प्रात्यक्षिकाची पाहणी केली. या पद्धतीमध्ये विविध मिश्रणाचा अंतर्भाव असलेले स्पेशल काँक्रीट तयार करून ते खड्ड्यामध्ये भरले जाते आणि साधारणपणे ते ४५ मिनिटे ते एक तासात पूर्ण सेट होते आणि सहा तासांनंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येतो; या पद्धतीने भरलेले खड्डे दीर्घकाल टिकतात, अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने आयुक्त डॉ. दांगडे यांना दिली.
सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडले जात होते; परंतु गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे हे डांबरीकरणाने त्वरित भरण्याची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी दिली. या वेळी डोंबिवलीतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता सुनील वैद्य, शैलेश मळेकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर व इतर अधिकारी वर्ग, अभियंता उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94227 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..