मुरबाड नगर पंचायतीने अखेर खड्डा बुजवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड नगर पंचायतीने अखेर खड्डा बुजवला
मुरबाड नगर पंचायतीने अखेर खड्डा बुजवला

मुरबाड नगर पंचायतीने अखेर खड्डा बुजवला

sakal_logo
By

मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : शहरातून म्हसा रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा अखेर मुरबाड नगरपंचायतीने बुजविला. हा खड्डा भरण्यासाठी पेव्‍हर ब्लॉक व रेती आणून ठेवली होती. मात्र, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी स्थानिक पातळीवर कारागिर मिळत नव्हता. त्यामुळे अंबरनाथ येथील कारागीर बोलावून हा खड्डा बुजविण्याचे काम पूर्ण केल्याची माहिती मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी दिली.
खड्डा बुजविण्यासाठी रेती व पेव्हर ब्लॉक्स आणून ठेवले असूनही खड्डा बुजविला जात नसल्याचे वृत्त दैनिक ‘सकाळ’मध्ये सोमवारी (२२ ऑगस्ट) प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेऊन खड्डा बुजविल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94232 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..