गणेशोत्सवाचे पावित्र्य जपा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाचे पावित्र्य जपा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड

गणेशोत्सवाचे पावित्र्य जपा, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड

sakal_logo
By

मनोर, ता. २४ (बातमीदार) : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजप्रबोधन करणारे देखावे, तसेच कार्यक्रमांचे आयोजन करून पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करावा. जुगार आणि मद्यसेवन टाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्याचे आवाहन पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले.
बोईसरच्या टीमा सभागृहात बोईसर पोलिस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी गायकवाड बोलत होते. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे उपस्थित होते.
सामान्य नागरिकांना अडचण निर्माण होईल अशी विसर्जन मिरवणूक न काढता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढावी. गणेशोत्सव कालावधीत सामाजिक कार्यासह, मंडपात प्रबोधनात्मक सजावटीकडे भर द्यावा. ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवण्यासाठी प्रयत्न करावा. गणेशोत्सव मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी, जोर जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा अप्पर पोलिस अधीक्षकांनी दिला.
राज्य सरकारने यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त केला आहे, त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशोत्सव मंडळांनी डीजेचा वापर टाळावा, सामाजिक जबाबदारी पाळून गणेशोत्सव साजरा करावा, मंडपात सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन बोईसरचे उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांनी केले.
या बैठकीसाठी बोईसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, बोईसर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94243 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..