पैशांसाठी छळणाऱ्या सासरच्या विरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैशांसाठी छळणाऱ्या सासरच्या विरोधात गुन्हा
पैशांसाठी छळणाऱ्या सासरच्या विरोधात गुन्हा

पैशांसाठी छळणाऱ्या सासरच्या विरोधात गुन्हा

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २४ (बातमीदार) ः वडिलांकडून पैसे आणत नाही म्हणून छळ करणाऱ्या पतीसह चौघांवर गोवंडीच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रुबीन खान असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीनंतर पती नदीम, सासरा नुरुलहुड्डा, सासू शेहनाज बेगम, दीर मोहसीन व नणंद आसमा यांच्याविरोधात नुकताच गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील सुमारे ४ वर्षे तिचा छळ सुरू असल्‍याची तक्रार केली होती. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
बैंगनवाडीच्या डम्पिंग रोडलगत असलेल्या शहनाई हॉलजवळ रुबीन ही पती नदीम व कुटुंबीयांसह राहते. तिचे नदीमवर प्रेम जडले होते. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबीयांनी त्यांचा विवाह करून दिला. लग्नाच्या एक वर्षानंतर तिला माहेरून पैसे आणण्यासाठी जाच सुरू झाला. ती वडिलांकडून पैसे आणत नाही म्हणून पती शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याला साथ देत सासू, सासरे, दीर व नणंददेखील शिवीगाळ करत व पैसे न आणल्यास नांदवणार नाही, असे धमकावत. अखेर या त्रासाला कंटाळून रुबीन हिने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिस आरोपींचा शोध घेत असून उपनिरीक्षक बाबू बेले या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94244 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..