गोदी कामगारांच्‍या पगारवाढीची बोलणी अटीशिवाय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोदी कामगारांच्‍या पगारवाढीची बोलणी अटीशिवाय करा
गोदी कामगारांच्‍या पगारवाढीची बोलणी अटीशिवाय करा

गोदी कामगारांच्‍या पगारवाढीची बोलणी अटीशिवाय करा

sakal_logo
By

शिवडी, ता. २४ (बातमीदार) ः भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांच्या पगारवाढीसाठी द्विपक्षीय वेतन समितीची पहिली बैठक २३ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत इंडियन पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आय.पी.ए.च्या वतीने के. जी. नाथ यांनी अहवाल सादर केला. या वेळी वेतन करारासाठी लादलेल्या जाचक अटी मागे घेण्याची मागणी सर्वच फेडरेशनच्या नेत्यांनी केली. वाटाघाटी कोणत्याही अटीशिवाय चालू झाल्या पाहिजेत, या मागणीचे निवेदन महासंघाच्या नेत्यांनी दिले.
बोनस योजना ताबडतोब मान्य करण्याची मागणी कामगार महासंघाच्या नेत्यांनी केली आहे. आय.पी.ए.चे व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी. दरम्यान काही मागण्यांवर स्थानिक पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, असे आय.पी.ए. अध्यक्ष राजीव जलोटा यांनी सांगितले. पुढील बैठक मुंबई येथे घेण्याचे ठरले असून, बैठकीची तारीख नंतर कळविली जाईल, असे सांगितले. यावेळी मोहम्मद हनीफ, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, असीम सूत्रधार, पी. के. सामंतराय आदी कामगार नेते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94266 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..