बत्ती गुलमुळे गणेश मूर्तिशाळांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बत्ती गुलमुळे गणेश मूर्तिशाळांना फटका
बत्ती गुलमुळे गणेश मूर्तिशाळांना फटका

बत्ती गुलमुळे गणेश मूर्तिशाळांना फटका

sakal_logo
By

पोलादपूर, ता. २४ (बातमीदार)ः गणेश मूर्तिशाळांमध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून रंगकाम, खडे-मोत्यांची सजावट, पितांबर, शेला, फेटा बांधण्याच्या कामात कारागीर व्यस्त आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर येथे सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने गणेशमूर्ती घडविण्यात अडचणी येत आहेत. मूर्तीवर कोरीव काम करताना वीज गरजेची आहे, मात्र वारंवार वीज गायब होत असल्‍याने कामात खंड पडतो.
महाडसह पोलादपूरमधील अनेक गणेशमूर्ती कारखान्यातून हजारो मूर्ती घडविण्यात येत असून यंदा शाडूच्या मूर्तींची मागणी अधिक आहे. कारागीर मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त असून कारखान्यांमध्ये दिवस-रात्र काम सुरू आहे.
कोरोनामुळे दोन वर्षे सण-उत्‍सव साजरा करण्यावर कडक निर्बंध होते. त्‍या वेळी कोकणातील गणेश मूर्तिकारांचे मोठे नुकसान झाले. उंच पीओपी मूतींबरोबरच यंदा शाडूच्या गणेशमूर्तींनाही भक्‍तांकडून मोठी मागणी आहे; तर काही कारागिरांनी कागदाचा वापर करून पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्‍या आहेत. महाड, पोलादपूरमध्ये दीडशेहून अधिक मूर्ती कारखाने असून हजारो गणेशमूर्ती तयार आहेत; तर काहींवर रंगकाम, सजावटीचे काम सुरू आहे, मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने कामात अडथळे येत आहेत. आगाऊ नोंदणी झालेल्‍या मूर्ती वेळेत पूर्ण करण्याबरोबरच दुकानदार, व्यावसायिकांनी दिलेल्‍या ऑर्डर पूर्ण करताना कारागिरांची दमछाक होण्याची शक्‍यता आहे.

महावितरणतर्फे मंगळवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याचा फटका मूर्ती कारखान्यांना बसला. पावसामुळे गणेशमूर्ती परिपूर्ण होण्यासही वेळ लागत असल्‍याने कामाचा खोळंबा होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94268 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..