कळव्यातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळव्यातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त
कळव्यातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

कळव्यातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

sakal_logo
By

कळवा, ता. २५ (बातमीदार) : गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना ठाणे-बेलापूर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येते. ठाणे-बेलापूर दरम्यान प्रचंड रहदारी असल्याने पोलिस आयुक्त कार्यालयापासून कळवा नाका ते विटावा मार्गावर प्रचंड वाहनांच्या रांगा लागतात. सायंकाळच्या वेळी तर कामगारांसाठी सिडको येथून सुटणाऱ्या बस, स्‍कूल बस व नवी मुंबई परिवहनच्या बस तसेच साकेत मार्गे येणारी काही अवजड वाहने सोडली जात असल्याने मार्गातील कोंडीत अजूनच भर पडत आहे.
ठाणे कारागृह ते पार विटावा जकात नाका अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, या रस्त्यावर उभ्या असलेल्या बेकायदा हातगाड्यामुळे हा रस्ता पूर्ण ठप्प होत आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या कळवा परिसरातील नागरिकांना वाहनांमधून वाट काढावी लागते. १६९ कोटी रुपये खर्च करून वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कळवा खाडीवर सुरू असलेल्या तिसऱ्या पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे; मात्र, पुलाच्‍या अंतिम टप्प्यातील काम अतिशय संथगतीने सुरू आहे. येत्या आठ दिवसांत गणेशोत्सव सुरू होणार असल्‍यामुळे कळवा परिसरातील हजारो नागरिकांना सध्या खरेदीसाठी ठाणे गाठावे लागते. गणेशमूर्ती घरी आणण्याची, मखराचे साहित्य आणण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याने या कोंडीचा मोठा फटका त्‍यांना बसत आहे. सायंकाळी कामावरून सुटलेल्या नोकरदारांना, विद्यार्थ्यांना आणि वाहनचालकांना या वाहतूक कोंडीत अडकावे लागते.
वाहतूक पोलिसांनी नियोजन करणे गरजेचे
पुलावरील राहिलेले अपूर्ण काम युद्धपातळीवर पूर्ण करून पूल तातडीने सुरू करावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून कोंडीतून मार्ग काढावा. तसेच, महापालिकेने किमान या पुलावरील एक बाजू तरी खुली करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून होत आहे.
---------------------------------
कोट
कळवा खाडीपुलावर होत असलेल्या रोजच्या वाहतूक कोंडीमुळे कामावरून रोज घरी जाताना उशीर होतो.
- शरद पवार, वाहनचालक, विटावा
------------------------
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कळव्यातील प्रचंड वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी नवीन पूल सुरू करावा.
- बळीराम म्हात्रे, रहिवासी, कळवा

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94274 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..