चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत
चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत

चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीस गेलेल्‍या व गहाळ झालेल्या मोबाईलपैकी सुमारे १४ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ७० मोबाईल हस्तगत करण्यात शहर पोलिस दलातील खंडणीविरोधी पथक व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष यांना यश आले आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाशांनी अशाप्रकारे चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्‍या मोबाईल फोनबाबतची माहिती जवळच्या पोलिस ठाण्‍यात द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्‍या हद्दीतून मोबाईल चोरीचे व गहाळ होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेत, शहर पोलिस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी याबाबत आढावा बैठक घेत, त्या मोबाईलचा व आरोपींचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश खंडणी विरोधी पथक व मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाला दिले होते. खंडणी विरोधी पथकाने १२ लाख ४० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ५५ मोबाईल, तर मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाने एकूण १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे १५ मोबाईल असा एकूण १३ लाख ९० हजार रुपये किमतीचे ७० मोबाईल हस्तगत केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94278 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..