केडीएमटीतील कर्मचाऱ्यांना शासनाची जुनी पेन्शन योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govt old pension scheme for KDMT employees
केडीएमटीतील कर्मचाऱ्यांना शासनाची पेन्शन योजना

केडीएमटीतील कर्मचाऱ्यांना शासनाची जुनी पेन्शन योजना

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमामधील (केडीएमटी) शेकडो कर्मचारीवर्गाला जुनी पेन्शन योजना आणि ५९ कंत्राटी कर्मचारीवर्गाला कायम करण्याच्या निर्णयाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दिल्याने संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. केडीएमटीत पाचशेहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी काम करत आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत परिवहन कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष रवी पाटील आणि पदाधिकारीवर्गाने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लक्ष्य वेधले होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंगळवारी, ३१ मे २०२२ रोजी ऑनलाईन बैठक झाली होती. त्यात कंत्राटी ५९ वाहकांना कायम करणे, पाचशेहून अधिक कर्मचारी वर्गाला जुनी पेन्शन योजना लागू करणे, तंत्र मदतनीस कर्मचारीवर्गाला सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, प्रलंबित थकबाकी देणे आदी प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच माजी नगरसेवक रवी पाटील यांनी कर्मचारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, तेव्हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले. मंत्रालयात जाऊन पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लक्ष वेधले. ३१ मेच्या बैठकीच्या इतिवृत्ताला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑगस्ट रोजी मंजुरी दिल्याने केडीएमटी कर्मचारीवर्गाच्या अनेक वर्षांच्या मागण्या मंजूर झाल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94284 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..