बदलापूरकरांच्या संतापाची सुप्रिया सुळेंकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूरकरांच्या संतापाची सुप्रिया सुळेंकडून दखल
बदलापूरकरांच्या संतापाची सुप्रिया सुळेंकडून दखल

बदलापूरकरांच्या संतापाची सुप्रिया सुळेंकडून दखल

sakal_logo
By

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) ः छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून बदलापूरसाठी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी सुटणाऱ्या लोकलच्या जागी एसी लोकल चालवण्यात आल्याने संतप्त बदलापूरकरांनी रेल्वे मास्तरच्या दालनाला घेराव घातल्याची घटना घडली होती. या संतापाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आशीष दामले यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना कळवताच त्यांनी गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना ट्विट करत लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
सायंकाळी चाकरमान्यांची रेल्वे प्रवासात मोठी गर्दी असते. त्यात बदलापूर, कर्जत, खोपोली या परिसरात राहणाऱ्या प्रवाशांना जेमतेम रेल्वे फेऱ्या आहेत. त्यातसुद्धा सायंकाळची ५.२२ ची लोकल अचानक एसी लोकल करण्यात आल्याने या लोकलच्या मागून सुटणाऱ्या ५ वाजून ३३ मिनिटांच्या खोपोली फास्ट या लोकलला अचानक प्रवाशांची संख्या वाढल्याने गर्दी होत होती. दुसरीकडे ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकल मात्र मोकळीच जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आणि याचा परिणाम म्हणजे गेले दोन दिवस बदलापूर स्थानकात संतापाचा उद्रेक झाला होता. या एसी लोकलवरून प्रवाशांमध्ये संताप असून ती रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. आता त्या मागणीला राजकीय पाठबळही मिळू लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94285 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..