एसटीचे विलिनीकरण करा अन्यथा कर्मचाऱ्यांची माफी मागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीचे विलिनीकरण करा अन्यथा कर्मचाऱ्यांची माफी मागा
एसटीचे विलिनीकरण करा अन्यथा कर्मचाऱ्यांची माफी मागा

एसटीचे विलिनीकरण करा अन्यथा कर्मचाऱ्यांची माफी मागा

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः एसटीचे विलीनीकरण व्हावे, यासाठी आझाद मैदानात मोठे आंदोलन करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने पगारवाढीसह एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या, तरीही विलीनीकरण हाच एकमेव पर्याय आहे, यावर आंदोलनाचे नेतृत्त्‍व करणारे आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत ठाम होते. आता विलीनीकरण कधी करणार, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी आमदार पडळकर व सदाभाऊ खोत यांना विचारला आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून त्यातील बहुतांश मागण्या मान्यही केल्या होत्या, तर विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयात होता. न्यायालयाचा निर्णय सरकारवर बंधनकारक आहे, असेच राज्य सरकारही स्पष्ट करत होते; परंतु आमदार पडळकर व सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत होते. आंदोलनादरम्यान या एसटी कर्मचाऱ्यांचे हालही झाले; पण त्याची जबाबदारी या आमदारांनी घेतली नाही. चर्चेतून मार्ग काढला जात असताना हे भाजपा आमदार एसटी कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देत होते. विलीनीकरण हाच एकमेव पर्याय आहे, हे ठासून सांगत होते. शेवटी ५४ दिवसांनंतर हा संप मिटला; पण विलीनीकरणाचा प्रश्न सुटला नाही.
आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण हाच एकमेव पर्याय सांगितला होता. आता भाजपचे सरकार राज्यात आलेले आहे. एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण कधी करणार, हे आमदार पडळकर व सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट करावे व त्यासाठी त्यांचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसटी विलीनीकरणाचा प्रश्न घेऊन विलीनीकरण करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून केवळ आपले नेतृत्व चमकवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर केला, याबद्दल जाहीर माफी मागावी, असेही राजहंस म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94287 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..