दिव्यातील अनधिकृत बांधकामे थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यातील अनधिकृत बांधकामे थांबवा
दिव्यातील अनधिकृत बांधकामे थांबवा

दिव्यातील अनधिकृत बांधकामे थांबवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : एकीकडे नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही, मग अनधिकृत बांधकाम करण्यासाठी पाणी कसे मिळते, याचे उत्तर दिवा प्रभाग समितीचे अधिकारी यांनी द्यायला हवे. येथील अनधिकृत बांधकामांना तात्काळ आवर घालणे गरजेचे असून निकृष्ट दर्जाच्या अनधिकृत बांधकामांमुळे शहरातील सुविधांवर ताण येत असून नागरिकांचे जीवनमानदेखील धोक्यात येत आहे. दिवा शहरातील सुविधांवर येणारा ताण पाहता तातडीने दिव्यातील अनधिकृत बांधकाम रोखण्यात अपयशी ठरलेले दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त फारुख शेख यांच्यावर कारवाई करावी, तसेच ही बांधकामे थांबवावीत, अशी मागणी भाजपचे रोहिदास मुंडे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात मुंडे यांनी दिवा सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे. दिवा शहरात अनेक समस्या आहेत. पाणी समस्या तीव्र स्वरूपाची आहे. लोकसंख्या वाढत असल्याने कचरा संकलन, आरोग्य सुविधा, गटारे, सांडपाणी निचरा यासारखे अनेक प्रश्न दिवा शहरात गंभीर स्वरूप धारण करत आहेत. एकीकडे अनेक समस्या असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. ही बांधकामे तातडीने थांबवण्याचे आदेश आपण द्यावेत, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. बांधकामांना जबाबदार असणाऱ्या दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त फारुख शेख या अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. याबाबत योग्य ती कारवाई न केल्यास येथील नागरिकांना प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94288 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..