नरेश म्हस्के यांची प्रवक्तेपदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेश म्हस्के यांची प्रवक्तेपदी निवड
नरेश म्हस्के यांची प्रवक्तेपदी निवड

नरेश म्हस्के यांची प्रवक्तेपदी निवड

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ ः ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून सुरतेची वाट धरली, तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले असले, तरीही ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यातदेखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेचा वर्षाव होत होता, तेव्हा त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली, तेव्हाही म्हस्के त्यांच्यासोबत होते. या वेळी त्यांनी केलेल्या जोरदार भाषणामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली. त्यानंतर राज्यभरात अनेक नियुक्त्या करण्यात आल्या.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94289 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..