व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचार!
व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचार!

व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचार!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुंबई महापालिकेच्या ४८० शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम चालवण्याबाबतच्या निविदेमध्ये पादर्शकता दिसून येत नाही. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करीत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या आणि तांत्रिक सल्लागारांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाल्याचा दावाही शेलार यांनी केला. 
आमदार शेलार यांनी आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची मुद्देसूद माहिती दिली आहे. निविदेच्या अटी-शर्ती एका विशिष्ट कंत्राटदाराला ही निविदा मिळावी म्हणून घालण्यात आल्या आहेत. ज्या कंपनीला हे काम देण्याचे प्रस्तावित केले आहे, सदर कंपनीने दिलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बोगस व खोटे असल्याचा दावा शेलार यांनी केला आहे. त्याची महापालिकेच्या संबंधितांनी पडताळणी न करताच सदर कंपनीला काम प्रस्तावित केल्याचेही शेलार यांनी म्हटले आहे. 
शैक्षणिक बाब असल्याने त्या विषयातील तज्ज्ञ व तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनीला हे काम मिळणे अपेक्षित होते; परंतु त्या कंपनीकडे सदर कामाचा कोणत्याही स्वरूपातील अनुभव असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकूणच कामाचा खेळखंडोबा झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही परिणाम होऊ शकतो. तांत्रिक सल्लागारांच्या माध्यमातून भ्रष्टाचार झाल्याने तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून प्रकरणाची चौकशी करावी, तसेच फेरनिविदा काढण्यात यावी, अशी विनंती शेलार यांनी पत्रातून केली आहे.

काय आहे हे कंत्राट?
सिनेहोम ब्रॉडकास्ट कंपनीला या कामासाठीचे कंत्राट मिळाले होते. व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा देण्यासाठी ९० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. पालिकेच्या एकूण ४५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमची सुविधा देण्यासाठीचे हे कंत्राट आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94309 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..