अत्याचार प्रकरणात एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अत्याचार प्रकरणात एकाला अटक
अत्याचार प्रकरणात एकाला अटक

अत्याचार प्रकरणात एकाला अटक

sakal_logo
By

पनवेल, ता. २४ (वार्ताहर) : ‘से हाय’ या डेटिंग ॲपवरून अल्पवयीन मुली व तरुणींना जाळ्यात ओढून लग्नाचे प्रलोभन दाखवत लैंगिक अत्याचार करणाऱ्या एकाला तळोजा पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कलमाखाली अटक केली आहे. सूरजभान सिंग (४८) असे त्याचे नाव असून एका अल्पवयीन मुलीसह ३ तरुणींवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.
तळोजा फेज-१ मध्ये इस्टेट एजंट म्हणून काम करणारा सूरजभान सिंग हा ‘से हाय’ या डेटिंग ॲपवरून तरुणींसोबत संपर्क करत होता. त्यानंतर चॅटिंगद्वारे त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळवून निराधार आणि गरीब अल्पवयीन तरुणींना लग्नाचे प्रलोभन दाखवून त्यांच्यावर अत्याचार करत होता. काही महिन्यांपूर्वी ऐरोलीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला देखील कॉलेजची फी भरण्याचे प्रलोभन दाखवून अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पीडित मुलीने तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सूरजभान सिंग याला बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याच्यावर खारघर पोलिस ठाण्यात देखील बलात्काराचा एक गुन्हा दाखल आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94314 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..