संदेशच्या कुटुंबीयांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संदेशच्या कुटुंबीयांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द
संदेशच्या कुटुंबीयांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द

संदेशच्या कुटुंबीयांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : विद्याविहार येथील संदेश दळवी या गोविंदाच्या कुटुंबीयांना स्थानिक शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. दहीहंडीच्या पाचव्या थरावरून कोसळून जखमी झालेल्या संदेशचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली १० लाख रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करताना संदेशचा मोठा भाऊ योगेश याला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही दिलीप लांडे यांनी सांगितले. लवकरच याबाबत मुख्यमंत्र्यांची या कुटुंबीयांना भेट घडवून दिली जाणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94317 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..