मुंबईतील खड्या बाबत आत्म सन्मान मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील खड्या बाबत आत्म सन्मान मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
मुंबईतील खड्या बाबत आत्म सन्मान मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईतील खड्या बाबत आत्म सन्मान मंचचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

sakal_logo
By

जोड
खड्ड्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मुंबईत बोरिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर नुकताच एका जोडप्याचा मृत्यू झाला. खड्ड्यात दुचाकीचे चाक अडकल्यामुळे मागून येणाऱ्या डम्परखाली चिरडून त्यांना जीव गमवावा लागला. मुंबईत दरवर्षी रस्त्यांवर खड्डे पडून अपघात होत आहेत. त्यासंदर्भात आत्म सन्मान मंचचे अध्यक्ष नित्यानंद शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत मुंबईतील खड्ड्यांबाबत तक्रार केली आहे. आत्म सन्मान मंचच्या वतीने खड्ड्यांबाबत शंख वाजवून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईतील मुख्य आणि अन्य महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत. बोरिवलीतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याबाबत जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94325 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..