मोनल चैनचे कंपनी आवारात अनधिकृत बांधकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोनल चैनचे कंपनी आवारात अनधिकृत बांधकाम
मोनल चैनचे कंपनी आवारात अनधिकृत बांधकाम

मोनल चैनचे कंपनी आवारात अनधिकृत बांधकाम

sakal_logo
By

मनोर, ता. २४ (बातमीदार) : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मोनल चैन या कंपनीने विनापरवाना बांधकाम केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाला तीन वेळा नोटीस बजावली. मात्र या नोटिशीला केराची टोपली दाखवत हे बांधकाम हटवले नाही.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक जे ५९ मधील मोनल चैन लिमिटेड या कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या आवारातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार तारापूरच्या एमआयडीसी कार्यालयात प्राप्त झाली होती. यात कंपनीने संरक्षक भिंतीवर दुमजली बांधकाम केले आहे. या बांधकामामुळे कारखान्यात अपघात झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन आणि रुग्णवाहिका यांना कारखान्याच्या आवारात प्रवेश करणे अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत मोनल चैन लिमिटेडच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. यात २१ ऑक्टोबर, ६ जून आणि ४ ऑगस्ट रोजी तीन वेळा नोटीस बजावून देखील कारखाना व्यवस्थापनाने एमआयडीसीच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे. कारखान्याच्या आवारातील मोकळ्या जागेतील अनधिकृत बांधकाम पाडले नाही.


प्रतिक्रिया ,
नुकताच उपअभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे. कारखान्याच्या अनधिकृत बांधकामाची माहिती घेतो. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- मुकेश लांजेवार, उप अभियंता, एमआयडीसी तारापूर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94333 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..