सोनू जलान याच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनू जलान याच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल
सोनू जलान याच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल

सोनू जलान याच्यासह इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ५० लाखांची खंडणी मागितल्‍याप्रकरणी क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या सोनू जालान, त्याचे साथीदार केतन तन्ना आणि जय तन्ना या तिघांविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोनू जालान आणि केतन तन्ना यांच्या तक्रारीवरून वर्षभरापूर्वी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे पोलिस दलातील तत्‍कालीन पोलिस अधिकारी आणि काही खासगी व्यक्ती अशा २८ जणांविरोधात पाच कोटी रुपयांचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता सोनू जालान आणि त्याच्या साथीदारांविरोधात एका व्यक्तीने खोट्या गुन्ह्यात अडकवू नये, यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा तक्रार अर्ज ठाणे न्यायालयात केला. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे जालान आणि त्याच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94337 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..