देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण कंत्राटात साटेलोटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण कंत्राटात साटेलोटे
देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण कंत्राटात साटेलोटे

देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण कंत्राटात साटेलोटे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. २४ ः मुंबई महापालिकेतील देवनार कत्तलखाना आधुनिकीकरण निविदेत प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप भाजपने केला आहे. काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तलखाना आधुनिकीकरणाच्या ४०० कोटीच्या कंत्राटातील त्रुटी बाहेर आल्याने हे कंत्राट रद्द झाले; मात्र सल्लागाराने संबंधित कंत्राटदाराला निविदा आधीच कागदपत्रे पुरवली, त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगत भाजपने हे प्रकरण आता पुन्हा लावून धरले आहे. संबंधित सल्लागारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्‍याकडे केली असल्याची माहिती भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. 
काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तल खान्याच्या आधुनिकरणासाठी ४०० कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी पालिकेने निविदा काढल्या होत्या. मात्र भाजपने या निविदेतील त्रुटी बाहेर काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भाजपने हे प्रकरण लावून धरल्याने प्रशासनाने हे कंत्राट रद्द केले. यामधील गंभीर बाब म्हणजे या कंत्राटातील सल्लागाराने निविदा निघण्यापूर्वीच संबंधित कंत्राटाची काही कागदपत्रे या निविदेत भाग घेणाऱ्या कंत्राटदारांना पुरविली होती. सल्लागार व कंत्राटदार यांचे संगनमत होते व त्यामधूनच निविदा भरण्यासंदर्भात ही कागदपत्रे दिली गेली होती, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विविध मुद्द्यावर सक्रिय झाल्याचे दिसत आहे. पालिका प्रशासनाने या संगनमताची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94353 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..