उधना ते मडगांवदरम्यान विशेष गाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उधना ते मडगांवदरम्यान विशेष गाड्या
उधना ते मडगांवदरम्यान विशेष गाड्या

उधना ते मडगांवदरम्यान विशेष गाड्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना ते मडगावदरम्यान चार अतिरिक्त रेल्वे चालविण्याची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेने यापूर्वी ६० गणपती विशेष चालवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या वर्षी पश्चिम रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांची संख्या ६४ वर पोहचली आहे.
ट्रेन क्र. ०९०२०/०९०१९ उधना-मडगाव साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसच्या २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२२ दरम्यान चार फेऱ्या धावणार आहेत. ज्यामध्ये ट्रेन क्र.०९०२० उधना-मडगाव स्पेशल ही उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० ला मडगावला पोहोचेल. ही रेल्वे २७ आणि २९ ऑगस्ट २०२२ रोजी धावेल. तसेच ट्रेन क्र. ०९०१९ मडगाववरून सकाळी १०.२० वाजता सुटेल आणि उधना येथे दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला पोहोचेल. ही ट्रेन २८ आणि ३० ऑगस्ट २०२२ रोजी धावेल.
या रेल्वे गाड्या नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबतील. या विशेष गाड्यांचे आरक्षण गुरुवारपासून (ता. २५) सर्व रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94355 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..