खड्डे न बुजवल्यास स्कूल बस बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे न बुजवल्यास स्कूल बस बंद
खड्डे न बुजवल्यास स्कूल बस बंद

खड्डे न बुजवल्यास स्कूल बस बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा 

मुंबई, ता. २४ : सध्या मुंबईतील रस्त्यांवर जागोजागी खड्डे असल्याने वाहनचालकांना स्कूलबस चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे स्कूल बसचालक-मालक आक्रमक झाले असून, येत्या १ सप्टेंबरपर्यंत रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास स्कूल बससेवा बंद करण्याचा इशारा स्कूल बस चालक-मालक संघटनेकडून देण्यात आला आहे. 

अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे असल्याने स्कूल बस रखडत आहेत. रस्त्यावरील कोंडीसोबतच खड्ड्यांच्या समस्येची भर त्यात पडली आहे. परिणामी बस शाळेत उशिरा पोहोचतात. त्यासोबतच बसचा देखभाल दुरुस्ती खर्चही वाढत आहे. आम्ही पालकांना विश्वासात घेऊन अशा मार्गावर बस बंद करण्याचा निर्णय घेत आहोत, अशी माहिती स्कूल बस ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली.  

मुंबईत सुमारे ८ हजार स्कूलबस आहेत. रस्त्यावरील खड्डे चुकवताना बसचालकांना जिकिरीचे होते. याकडे पालिका, सरकारचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाल्याने स्कूलबस संघटना आक्रमक झाली आहे. आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे अनिल गर्ग यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने खड्डे तातडीने बुजवा; अन्यथा १ सप्टेंबरनंतर स्कूलबस तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेणार असल्याचे गर्ग यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94356 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..