ठाण्यापर्यंत ट्रॅकवरून पायी वारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यापर्यंत ट्रॅकवरून पायी वारी!
ठाण्यापर्यंत ट्रॅकवरून पायी वारी!

ठाण्यापर्यंत ट्रॅकवरून पायी वारी!

sakal_logo
By

किरण घरत ः सकाळ वृत्तसेवा
कळवा, ता २४ : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला कळव्यातील रेल्वे प्रवाशांसमोरचा तिढा अजूनही सुटला नसून तो प्रश्न आता राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर आला आहे. कळव्यातील रेल्वे प्रवाशांची ठाण्यापर्यंत ट्रॅकवरून पायी वारी सुरू आहे. कळवा रेल्वेस्थानकात झालेल्या उद्रेकानंतर बदलापूर, ठाणे व मुंब्र्यातही तो प्रश्न धुमसू लागल्याने आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न मांडला आहे; तर प्रवासी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी धीम्या गाड्यांची संख्या कमी होती; परंतु ठाणे ते दिवादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर कळव्यातील प्रवाशांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. या नव्या ट्रॅकवरून मेल एक्स्प्रेस सुरू करण्याची अपेक्षा असताना जुन्या ट्रॅकवरून सुरू केल्याने मात्र अपेक्षा भंग झाला आहे. त्यातच कळवा रेल्वेस्थानकात सकाळी प्रचंड गर्दीमुळे रेल्वे डब्यात चढायलाही मिळत नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मदार कारशेडमधून सुटणाऱ्या चार गाड्यांवर होती. मात्र चार दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने साध्या लोकल बंद करून अचानक या चार गाड्यांपैकी तीन गाड्या एसी सोडल्याने हजारो प्रवाशांना कारवाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे उद्रेक झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कळवा स्थानकात ५० रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. कळवा स्थानकाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.
प्रवासी रेल्वेचे तिकीट व पास काढल्यानंतर बसून प्रवास करण्यासाठी कळवा कारशेडमधून गाडी मिळेल या आशेने येत आहेत, परंतु त्यांना गेले तीन दिवस कळवा ते ठाणे रेल्वे पटरीवरून पायी वारी करावी लागत आहे.
...
आंदोलनाचा इशारा
कळव्यात सर्वसामान्य प्रवाशांचे हाल सुरू आहेत. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार न केल्यास रविवारी आम्ही आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा कळवा पारसिक रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94358 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..