घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल
घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

sakal_logo
By

कासा, ता. २४ (बातमीदार) ः ठाणे कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे कासारवडवली ते गायमुखापर्यंत काम सुरू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर नागला बंदर ते लोढा स्प्लेंडर सोसायटी घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत २३ ते २८ ऑगस्ट यादरम्यान बदल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळवले आहे.
गुजरात महामार्गाने ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. मुंबई, वसई, विरारकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना फाउंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग म्हणून गुजरात, मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदर रोडच्या दिशेने येणारी वाहने ही चिंचोटी नाका येथून कामण अंजूरफाटा- माणकोली भिवडीमार्गे इच्छितस्थळी जातील. अवजड वाहने सोडून इतर वाहनेही नागला बंदर सिग्नल कटजवळ डावे बाजूस वळण घेऊन सेवा रस्त्याने पुढे लोढा स्प्लेंडर सोसायटी कटजवळ उजवे वळण घेऊन मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छितस्थळी जातील.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94359 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..