टीएमटी वाहकाचे विद्यार्थिनीशी दुर्व्यवहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीएमटी वाहकाचे विद्यार्थिनीशी दुर्व्यवहार
टीएमटी वाहकाचे विद्यार्थिनीशी दुर्व्यवहार

टीएमटी वाहकाचे विद्यार्थिनीशी दुर्व्यवहार

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ ः भास्करनगर येथून शाळकरी मुलींसाठी सुरू केलेल्या टीएमटी बसमधील पुरुष वाहकाने एका मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे; मात्र परिवहन प्रशासनाने केवळ बदली करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत परिवहन सदस्य शमीम खान यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अखेरीस परिवहन सभापती विलास जोशी यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
मागील आठवड्यात एका हायस्कूलमधील एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न टीएमटी वाहकाने केला होता. या प्रकरणाबद्दल मंगळवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत शमीम खान यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात आवाज उठवल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर वाहकाला निलंबित करण्यात येणार आहे, असे शमीम खान यांनी सांगितले. दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानक ते दत्तमंदिर कल्याण फाटादरम्यान बससेवा सुरू करावी, मुंब्रा स्टेशन ते माजिवडादरम्यान धावणाऱ्या बससेवेच्या वेळापत्रकात सुधारणा करावी आदी मागण्या या बैठकीत शमीम खान यांनी केल्या. या मागण्यांबाबत परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही खान यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94366 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..