प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांची मालकी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांची मालकी द्या
प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांची मालकी द्या

प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांची मालकी द्या

sakal_logo
By

वाशी, ता. २५ (बातमीदार) ः अधिनियमात सुधारणा करून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्याचबरोबर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना तातडीने द्यावा. तसेच सिडकोच्या मालकीच्या लिज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय तातडीने घेण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी विधिमंडळात केली आहे.
नवी मुंबईत सिडकोने मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गटासाठी अनेक गृहप्रकल्प १९७० च्या दशकात राबविले. त्याला जवळजवळ ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रचलित दर आकारून गृहप्रकल्पातील सदनिका सिडकोने विकल्या. सदनिकाधारकांनी पूर्ण रक्कम सिडकोकडे भरून घरांचा ताबा घेतला. सदनिका विकल्या; परंतु इमारतीखालील जमिनी ९९ वर्षांच्या लिजवर दिल्या असल्याने जमिनीचा मालकी हक्क सिडकोकडेच आहे. त्यामुळे सदनिका हस्तांतरित करणे, विकणे वा इतर व्यवहार करावयाचे असल्यास सिडकोकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. शिवाय या प्रकल्पातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांना कन्व्हेयन्स डीड होत नसल्यामुळे इमारतींचा पुनर्विकास करणे शक्य होत नाही. त्यामुळे सिडकोने स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर काही ठिकाणी मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न गट तसेच विविध घटकांसाठी सदनिका बांधून लिजवर दिलेली घरे सुद्धा फ्री होल्ड करण्यात यावीत तसेच खासगी विकासकांना दिलेल्या भूखंडांवरील सर्व बांधकामे फ्री होल्ड करण्याची मागणी नाईक यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94379 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..