इंटकच्या पाठपुराव्यामुळे १३ जणांना नोकऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंटकच्या पाठपुराव्यामुळे १३ जणांना नोकऱ्या
इंटकच्या पाठपुराव्यामुळे १३ जणांना नोकऱ्या

इंटकच्या पाठपुराव्यामुळे १३ जणांना नोकऱ्या

sakal_logo
By

तुर्भे, ता. २५ (बातमीदार) : महापालिका प्रशासनात काम करताना मृत झालेल्या कामगारांच्या परिवारातील सदस्यांना अनुकंपा तत्त्वावर महापालिका प्रशासनाने सेवेत घ्यावे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या नवी मुंबई इंटकच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत १३ जणांना नोकरीत घेतले आहे.
अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याबाबतची तरतूद आहे. अशा प्रकारचे प्रस्ताव सन २०१८ पासून प्रलंबित होते. दिवंगत महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या विषयाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने प्रशासन विभागास देण्यात आले होते. त्यावर कार्यवाही करीत सन २०१८ नंतर पहिल्यांदाच महापालिका सेवेत असताना मृत्यू झालेल्या १३ अधिकारी, कर्मचारी यांच्या पात्र कुटुंबीयांना बुधवारी अनुकंपा तत्त्वावर लिपिक- टंकलेखक पदाचे नियुक्ती आदेश देण्यात आले. कामगार नेते रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई इंटकच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला आहे. आयुक्तांची भेट घेऊन मागणी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94384 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..