उल्हासनगरातील अनधिकृत झोपड्यांचे बस्तान हटवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरातील अनधिकृत झोपड्यांचे बस्तान हटवले
उल्हासनगरातील अनधिकृत झोपड्यांचे बस्तान हटवले

उल्हासनगरातील अनधिकृत झोपड्यांचे बस्तान हटवले

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : रेल्वे स्थानकाजवळील भूखंडावर अतिक्रमण करून त्यावर थाटलेले अनधिकृत झोपड्यांचे बस्तान उल्हासनगर महापालिकेने हटवले. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला फलाट क्रमांक १ च्या बाजूलाच पालिकेचा भूखंड असून त्यावर अतिक्रमण करून अनधिकृत झोपड्यांचे बस्तान बसवण्यात आले होते. आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी, अजित गोवारी यांनी जेसीबीच्या मदतीने सर्व झोपड्या हटवल्या. त्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. पुन्हा या भूखंडावर कुणी अतिक्रमण करता कामा नये, यासाठी या ठिकाणी एखादा लोकोपयोगी उपक्रम किंवा प्रकल्प हाती घेणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94395 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..