विरारमध्ये तारामाई वर्तक ‘प्रेरणा दिन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारमध्ये तारामाई वर्तक ‘प्रेरणा दिन’
विरारमध्ये तारामाई वर्तक ‘प्रेरणा दिन’

विरारमध्ये तारामाई वर्तक ‘प्रेरणा दिन’

sakal_logo
By

विरार, ता. २५ (बातमीदार) : राज्याच्या माजी मंत्री आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला अध्यक्षा कै. तारामाई वर्तक यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘प्रेरणा दिन’ विरारमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी तारामाईंच्या ‘जीवन प्रवास’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते
आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्था संचालित विरार पूर्व येथील तारामाई वर्तक मेमोरियल अकॅडमी शाळेत हा प्रेरणा दिन संस्थेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. सखाराम डाखोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते; तर कार्यक्रमाला आगाशी, विरार अर्नाळा संस्थेचे अध्यक्ष विकास नरसिंह वर्तक आणि पल्लवी वर्तक व शाळा समितीचे सदस्य पुष्कराज वर्तक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुणे सखाराम डाखोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बालकविता ऐकवल्या; तर अध्यक्ष विकास वर्तक यांनी माईंच्या आठवणींना उजाळा देत माईंचे समाजसेवा व शिक्षण सेवेचे कार्य अविरत चालू ठेवणार असल्याचे सांगितले. प्रेरणा दिनी माईंच्या जीवन प्रवास या विषयावर विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शब्दकोडे, पत्रलेखन, माईंच्या जीवनावर आधारित चलचित्रपट, तसेच पोस्टर मेकिंग या सर्व स्पर्धांचा निकाल घोषित करून बक्षीसवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमी कोरिया व मनाली वर्तक यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94396 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..