देहर्जे धरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहर्जे धरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
देहर्जे धरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

देहर्जे धरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यातील साखरे येथे देहर्जे धरण प्रकल्पाला सुरुवात झाली आहे; मात्र प्रकल्पग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा भूसंपादनाचा मोबदला अद्याप देण्यात आलेला नाही. तसेच पुनर्वसनाबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. हा प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांसाठी लाभाचा नसून तो रद्द करावा, अशी मागणी प्रकल्पबाधितांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक, आमदार मनीषा चौधरी यांच्याकडे केली.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकताच विक्रमगड दौरा केला. या वेळी प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन त्यांना निवेदन देत बाधित कुटुंबाकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असल्याने हा प्रकल्प स्थगित करावा, अशी मागणी करण्यात आली. विक्रमगड तालुक्यातील साखरे गावाच्या परिसरात देहर्जे हा प्रकल्प सुरू आहे. ९३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असलेल्या या धरणात २३८ हेक्टर खासगी लाभार्थ्यांची जमीन पाण्याखाली जाणार आहे. प्रकल्पात खुडेद, तीवसपाडा, पवारपाडा, जाधवपाडा, जांभा या गाव पाड्यांवरील जवळपास ४०२ कुटुंबे बाधित होणार आहेत; मात्र पुनर्वसन व भूसंपादन मोबदला याबाबत सरकारने अजूनही कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट न केल्याने आदिवासी लोकवस्ती असलेल्या बाधित कुटुंबांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत. यातच स्थानिकांनी धरण नको, अशीच भूमिका स्पष्ट केली आहे. आदिवासींच्या विरोधाकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त राजू थोरात व अन्य स्थानिकांनी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94398 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..