पीएमजीपी वसाहतीत धामण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमजीपी वसाहतीत धामण
पीएमजीपी वसाहतीत धामण

पीएमजीपी वसाहतीत धामण

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः मानखुर्दच्या पीएमजीपी वसाहतीतील इमारत क्रमांक १४ मध्ये बुधवारी धामण आढळली. तेथील रहिवाशांच्या नातेवाईकाने तिला सुखरूप ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडल्याचे स्थानिकांनी सांगितले. बांधकाम साहित्य घेऊन एक ट्रक बुधवारी दुपारी पीएमजीपी वसाहतीच्या इमारत क्रमांक १४ जवळ आला होता. त्यातून धामण आल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान इमारतीत धामण शिरल्‍यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांनी सर्पमित्राचा शोध घेण्यास सुरुवात केली. इमारतीतील रहिवाशांच्या नातेवाईकाला याविषयी कळवण्यात आले. त्याने या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94399 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..