पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली
पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली

पालघर-अमळनेर एसटी टेम्पोला धडकली

sakal_logo
By

मनोर, ता. २५ (बातमीदार) : मनोर विक्रमगड रस्त्यावरील केव फाट्याजवळ पालघरहून अमळनेरला जाणारी एसटी बस आणि टेम्पो यांच्यात धडक झाली. गुरुवारी पहाटे झालेल्या या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
पालघरवरून अमळनेरकडे जाणारी एसटी बस मनोर विक्रमगड रस्त्यावर केव फाट्यावरून प्रवासी घेतल्यानंतर पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. काही अंतर पुढे गेल्यावर बस आणि समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातात एसटी चालकासह पाच प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये विक्रमगड जव्हारच्या दिशेने जाणारे तीस प्रवासी प्रवास करीत होते.

अपघातात जखमींची नावे
एसटी बसचालक तवाब खान (३२), कैमुद्दीन शेख (३१) धीरेंद्र यादव (३२) राधेश्याम तिवारी (३८), रवींद्र यादव (४०) आणि दयानंद (५४).

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94400 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..