नगरसेवक दीपक तावडे यांच्या पुढाकाराने ३०० जलजोडण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेवक दीपक तावडे यांच्या पुढाकाराने ३०० जलजोडण्या
नगरसेवक दीपक तावडे यांच्या पुढाकाराने ३०० जलजोडण्या

नगरसेवक दीपक तावडे यांच्या पुढाकाराने ३०० जलजोडण्या

sakal_logo
By

कांदिवली, ता. २५ (बातमीदार) ः पालिकेच्या जल विभागाच्या सहकार्याने नगरसेवक दीपक तावडे यांनी वॉर्ड क्र. २० मधील रहिवाशांना ३०० पेक्षा जास्त जलजोडण्या अल्पदरात देण्यात आल्या. या भागातील रहिवाशांना नेहमीच पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लाते. या जलजोडण्यांमुळे त्‍यांना मोठा दिलासा मिळाला. पालिकेकडून नळजोडणी घेण्यासाठी असणारी प्रक्रिया किचकट, खर्चिक आणि वेळ लागणारी आहे. या विभागात नागरिकांनी केलेल्या पाण्याच्या समस्येबाबत तक्रारींचा अभ्यासपूर्वक विचार करून नगरसेवक तावडे यांनी पुढाकार घेतला. त्‍यांनी जल विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्‍यानंतर प्लंबर गजानन गवई यांना जबाबदारी दिली. त्‍यांनी कमी वेळेत व कमी खर्चात जलजोडणीची कामे केली. तावडे यांच्या मदतीने आदर्शनगर ४४, श्रावणनगर १३, महाराष्ट्र नगर १६, मारुतीनगर २१, के. डी. कंपाऊंड ३९, खान गल्ली २२, भंगार गल्ली ७, झाडुवाला गल्ली १९, चारकोप गाव २, रेणुका नगर १२, बंदरपाखाडी गाव २ असे जलमापक देण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94407 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..