जुईनगरमध्ये आज बैलपोळ्याचा उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुईनगरमध्ये आज बैलपोळ्याचा उत्साह
जुईनगरमध्ये आज बैलपोळ्याचा उत्साह

जुईनगरमध्ये आज बैलपोळ्याचा उत्साह

sakal_logo
By

जुईनगर, ता. २५ (बातमीदार) ः श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजे बैल पोळा आहे. हिंदू धर्मामध्ये बैल पोळा या सणाला वेगळे महत्त्व आहे. या दिवशी शेतकऱ्यांच्या सुख-दुःखामध्ये सहभागी होऊन वर्षभर राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. नवी मुंबईतील जुईनगर भागात आजही बैलपोळा साजरा करण्याची परंपरा जोपासण्यात येत आहे.
ग्रामीण भागांमधून मोठ्या संख्येने नवी मुंबईत आलेला समाज अधिक असल्याने आजही बैल पोळा हा सण साजरा केला जातो. यानिमित्त जुईनगरमध्ये अनेक ठिकाणी मातीचे बैल खरेदी केले जातात. नंतर त्यांची हवीतशी रंगरंगोटी केली जाते. कुभारांकडून मातीच्या बैलाच्या शिंगाला सोनेरी लाल रंग लावला जातो. लहान आकारापासून मोठ्या आकारामध्ये उपलब्ध असलेल्या या मूर्तींचे घरोघरी विधिवत पूजन केले जाते. या वेळी घरासमोर रांगोळी, पुरण पोळीचा गोडाचा नैवेद्य करून संध्याकाळी पूजा करून त्यावर गुलाल उधळून सणाचा आनंद घेतला जातो.
------------------------------
ग्रामीण भागांत उत्साहाचे वातावरण
ग्रामीण भागामध्ये लाडक्या बळीराजाला सजवल्यानंतर अनेक ठिकाणी वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. अनेक गावात बैल पोळ्याच्या दिवशी जत्रा भरते. मोठ्या थाटामाटात सण साजरा केला जातो. तसेच नैवेद्य दाखविल्यानंतर सर्वजण एकत्र बसून जेवण करतात.
----------------------------------------
बैल पोळा हा सण मातीचे बैल खरेदी करून साजरा करतो. बैलांची पूजा करून त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. सणांची परंपरा जपल्याने येणारी पिढीदेखील हे सण साजरे करतील.
- श्रीशा मावळे, रहिवासी, जुईनगर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94419 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..