सकाळ प्रकाशनची कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ प्रकाशनची कार्यशाळा
सकाळ प्रकाशनची कार्यशाळा

सकाळ प्रकाशनची कार्यशाळा

sakal_logo
By

नवोदित लेखकांसाठी उद्या ‘सकाळ प्रकाशन’ची कार्यशाळा
लिहिणाऱ्या हातांना बळ देण्यासाठी अनोखा उपक्रम
ठाणे, ता. २५ : आपले लिखाण पुस्तक स्वरूपात यावे, असे वाटत असलेल्या लेखकांसाठी ‘सकाळ’ अनोखे व्यासपीठ घेऊन येत आहे. त्याअंतर्गत नवोदित आणि प्रस्थापित लेखकांबरोबरच पुस्तक प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी शनिवारी (ता. २७) ठाण्यात ‘सकाळ प्रकाशन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘सकाळ प्रकाशन’चे प्रमुख आशुतोष रामगीर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
पुस्तक तयार होण्यापासून त्याचे प्रकाशन, वितरण आणि मार्केटिंग अशी मोठी प्रक्रिया आहे. ज्यांना ती जाणून घ्यायची आहे किंवा पुस्तक प्रकाशनासंबंधी काही प्रश्न आहेत, अशा लेखकांसाठी ‘सकाळ प्रकाशन’ची कार्यशाळा उपयुक्त ठरू शकते. कार्यशाळेत पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवण्यात येणार आहे.
पुस्तकाचे लेखन, संपादन, कव्हरचे डिझाईन, छपाई, प्रकाशनासंबंधी करार, वितरण, आर्थिक बाबी, रॉयल्टी, कॉपीराईट इत्यादींबाबत सविस्तर माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाशित झाल्यावर ते बाजारात विक्रीसाठी कसे उपलब्ध करायचे, याचेही मार्गदर्शन मिळणार आहे. ठाणे पश्चिमेकडील पाचपाखाडी परिसरातील महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात सायंकाळी ५ ते ७ दरम्यान होणारी कार्यशाळा मोफत असून त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. आजवर ‘सकाळ’ने सहाशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तके जगभरात वितरित केली आहेत. ज्यांना स्वतःची पुस्तके प्रकाशित करायची आहेत आणि पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायची आहे, अशा लेखक-वाचकांनी कार्यशाळेला आवर्जून उपस्थित राहावे.

कार्यशाळेचे ठिकाण ः ठाणे महापालिकेचे कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, संत ज्ञानेश्वर मार्ग, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम)
कधी ः शनिवार, २७ ऑगस्ट
वेळ ः सायंकाळी ५ ते ७
नोंदणीसाठी संपर्क क्रमांक ः ८८८८८४९०५० (सकाळी १० ते संध्याकाळी ६)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94427 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..