यकृत निकामी झालेल्या महिलेची यशस्वी प्रसूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यकृत निकामी झालेल्या महिलेची यशस्वी प्रसूती
यकृत निकामी झालेल्या महिलेची यशस्वी प्रसूती

यकृत निकामी झालेल्या महिलेची यशस्वी प्रसूती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गुंतागुंतीच्या ॲक्युट म्हणजेच यकृत अधिक निकामी झालेल्या महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या मातेला दोन जुळी बाळे झाली असून माता व बाळ यांची प्रकृती स्थिर आहे.
बोरिवलीत राहणाऱ्या श्वेता दुबे (४४ वर्षीय) ही महिला आयव्हीएफद्वारे जुळ्या बाळांसह ७ महिन्यांच्या गरोदर होत्या. गर्भधारणेदरम्यान त्यांची प्रकृती स्थिर होती; पण अचानक त्यांच्या डोळ्यांचा पिवळा रंग आणि लघवी गडद होण्यास सुरुवात झाली. त्यांना सौम्य कावीळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जवळच्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले; पण त्‍यांना सतत संवेदनेत बदल (तंद्री) आणि हादरे बसू लागले. नातेवाईकांनी त्‍यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तेथील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेपूर्वी बाळाच्या फुप्फुसांच्या परिपक्वतेसाठी आईला स्टिरॉइड्सचे २ डोस देण्यात आले. ॲक्युट लिव्हर फेल्युअरमध्ये कमी रक्तदाब, किडनीला दुखापत आणि रक्तस्राव वाढण्यास सुरुवात झाली; पण प्रसूतीनंतर तिने दोन जुळ्यांना जन्म दिला. ज्यांचे वजन अकाली प्रसूतीमुळे कमी होते; पण बाळांची प्रकृती स्थिर होती. आईला २ दिवस यकृताच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दोन दिवसांनी ती हळूहळू औषधांना प्रतिसाद देऊ लागली. तिच्या सुधारणेनंतर व्हेंटिलेटरपासून मुक्त करण्यात आले व तिचा रक्तदाबही स्थिर झाला.
यकृत भूलतज्ज्ञ (डॉ. हर्षित), हेपॅटोबिलरी सर्जन (डॉ. गौरव चौबळ), हेपॅटोलॉजिस्ट आणि यकृत अतिदक्षता तज्ज्ञ (डॉ. उदय सांगलोडकर) या डॉक्टरांच्या टीमने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.

अक्यूट लिव्हर फेल्युअर रुग्णांमध्ये प्रमुख गुंतागुंत म्हणजे गंभीर कोग्युलोपॅथी
(रक्तस्राव वाढण्याची स्थिती), एन्सेफॅलोपॅथी (कोमा) साठी व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यक असते. गरोदरपणात तीव्र यकृत निकामी होणे यासारखी प्रकरणे अत्यंत दुर्मिळ आहेत. १२ हजारांमध्ये १ अशीही गर्भधारण असते.
– डॉ. उदय सांगलोडकर, वरिष्ठ सल्लागार, हिपॅटोलॉजी आणि यकृत प्रत्यारोपण

लक्षणे काय -
२८ आठवड्यांनंतर कावीळ सुरू होणे, डोळे आणि लघवीचा पिवळा रंग, बदललेली संवेदना, तंद्री आणि काही वेळा कोमा
बहुतेक प्रकरणांमध्ये ५० टक्के टक्क्यांमध्ये यशस्वी सिझेरियन केले तर आईला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता नसते.
यात मृत्यूचे प्रमाण ९० टक्के मुलांसाठी आणि ७० टक्के मातेसाठी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94432 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..