कॉर्पोरेट कीर्तनात उलगडले समर्थांच्या लेखनातील व्यवस्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉर्पोरेट कीर्तनात उलगडले समर्थांच्या लेखनातील व्यवस्थापन
कॉर्पोरेट कीर्तनात उलगडले समर्थांच्या लेखनातील व्यवस्थापन

कॉर्पोरेट कीर्तनात उलगडले समर्थांच्या लेखनातील व्यवस्थापन

sakal_logo
By

ठाणे : श्रीकृष्ण जयंतीचे औचित्य साधून पितांबरी सांस्कृतिक मंचाच्या वतीने समर्थ साहित्य अभ्यासक समीर लिमये यांचे ‘कॉर्पोरेट कीर्तन’ आयोजित करण्यात आले होते. ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘कॉर्पोरेट कीर्तन’चा २०० वा प्रयोग सादर करण्यात आला. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार आजच्या कार्पोरेट युगातही तंतोतंत लागू होतात, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. मनाचे श्लोक हा केवळ लहान मुलांच्या पाठांतराचा विषय नसून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शक ठरणारे ज्ञान आहे, असे ते म्हणाले. पारंपरिक कीर्तनाचे स्वरूप आणि त्यासोबतच पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनची जोड असा जुन्या-नव्याचा मिलाप त्यांनी साधला होता. सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, सामाजिक व आध्यात्मिक असे विविध विषय लोकांसमोर मांडता यावेत, यासाठी ‘पितांबरी सांस्कृतिक मंच’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94446 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..