रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक.
रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक.

रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक.

sakal_logo
By

खड्ड्यांविरोधात मनसेचा
‘कपडे धो’ आंदोलनाचा इशारा
मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः मानखुर्दमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी (ता. २४) मनसेचे प्रभाग क्रमांक १४१ चे शाखा अध्यक्ष सचिन ससाणे यांनी पालिकेच्या परिमंडळ ५ च्या संबंधित उप-आयुक्तांना त्याबाबत पत्र दिले आहे. खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात आले नाहीत तर ‘कपडे धो’ आंदोलन करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यालगत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर वस्ती आहे. जोडरस्त्याकडून साईबाबा मंदिरापर्यंत वस्तीच्या मधून रस्ता जातो. त्याला लल्लूभाई वसाहतीतील मुख्य रस्ताही येऊन मिळतो. रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांत पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती मनसेने पत्राद्वारे व्यक्त करत खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी केली आहे. खड्डे बुजवले नाही तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अनोखे ‘कपडे धो’ आंदोलन करत पालिकेचा निषेध करणार असल्याचेही मनसेने पत्रात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94449 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..