मैदा असल्याचे भासवून गुटख्याची तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैदा असल्याचे भासवून गुटख्याची तस्करी
मैदा असल्याचे भासवून गुटख्याची तस्करी

मैदा असल्याचे भासवून गुटख्याची तस्करी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : मैदा असल्याचे भासवून उत्तर प्रदेश राज्यातून ट्रकमधून लपवून महापे एमआयडीसी भागात आणला गेलेला तब्बल १४ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा पोलिस उपायुक्तांच्या अधिपत्याखालील पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १६ लाख रुपये किमतीची तीन वाहने जप्त करून गुटख्याची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.
महापे एमआयडीसीतील एकवीरा ट्रान्स्पोर्ट येथे एका आयशर ट्रकमधून गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती परिमंडळ- १ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सलिम शेख, पोलिस हवालदार संदीप ढवळे व त्यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने महापे एमआयडीसीतील एकवीरा ट्रान्स्पोर्ट येथे छापा मारला. या गुटख्याबाबत अधिक चौकशी केली असता घाटकोपर येथे राहणाऱ्या जय भानुशाली याच्या सांगण्यावरून त्यांनी उत्तर प्रदेश येथून गुटखा आणल्याचे सांगितले. या वेळी पोलिसांनी ट्रकमधील गोण्यांची तपासणी केली असता, बाजूने मैद्याच्या गोण्या व आतल्या बाजूस गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या गोण्या ठेवून त्या उत्तर प्रदेशमधून नवी मुंबईत आणण्यात आल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधून सहा लाख ३० हजार रुपये किमतीच्या १५ गोण्या व बोलेरो पिकअपमधील आठ लाख ४० हजार रुपये किमतीचा गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूच्या २० गोण्या असा एकूण १४ लाख ७० हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी अभिषेककुमार तिवारी (२३), रंजितकुमार राजभर (१९) आणि गुटख्याचा माल मागवणारा जयप्रदीप भानुशाली (३४) या तिघांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा मानदे कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94472 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..