वसई-विरारच्या प्रवेशद्वारवरच वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारच्या प्रवेशद्वारवरच वाहतूक कोंडी
वसई-विरारच्या प्रवेशद्वारवरच वाहतूक कोंडी

वसई-विरारच्या प्रवेशद्वारवरच वाहतूक कोंडी

sakal_logo
By

नालासोपारा, ता २५ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई, नालासोपारा व विरार फाटा या प्रवेश मार्गांवर अनाधिकृत पार्किंग, फेरीवाले यांच्या अतिक्रमणामुळे शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुंबई-अहमदाबाद या मुख्य शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग वसई, नालासोपारा व विरार या शहरांतून जातो. मागील काही वर्षांत या तीनही शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. या महामार्गावर वसई, नालासोपारा व विरार फाटा हे या शहरांत येण्याचे प्रवेश मार्ग आहेत. पण मुंबई, ठाणे, नाशिक व अन्य शहरांतून येणारे प्रवासी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून निश्चित स्थळी जात असतात; परंतु महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग केले जात आहे. तसेच पावसाळ्यादरम्यान या महामार्गावर पडलेले खड्डे ही प्रवाशांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या विषयांतील गांभीर्य लक्षात घेऊन यावर उपाययोजना करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94473 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..